उपक्रम - वार्षिक नियोजन


                        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आंबी दुमाला, ता.संगमनेर
                                          उपक्रम - वार्षिक नियोजन आराखडा 



नवागतांचे स्वागत... प्रवेशोत्सव      . 

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मधील नवीन शैक्षणिक वर्षातील दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले. सकाळी ८:३० वा. गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली . याप्रसंगी सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व  सदस्य फेरीत सामील झाले होते. प्रभातफेरी आणि विविध घोषणा यामुळे शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली. विद्यार्थ्यांच्या हातात घोषवाक्य असणारे फलक सर्वांचे लक्ष वेधीत होते. शाळेसमोर सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली. नवीन विद्यार्थी स्वागत कार्यक्रमाची नियोजनाप्रमाणे सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी केले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,पाठ्यपुस्तके, खाऊ आणि लेखनसाहित्य वाटप करून स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील विविध शालेय उपक्रमांसाठी  विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गावातील सर्व पालक,सर्व सदस्य उपस्थित होते. शालेय उपक्रम आणि प्रगतीसाठी सर्वांनी साहाय्य करण्याचे ठरले.  शालेय उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली.
  सर्वामध्ये समानतेची भावना वाढीस लागली.
  आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
  

पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम :   
                                                      
   आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मधील नवीन शैक्षणिक वर्षातील पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व  सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले. पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाची नियोजनाप्रमाणे सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी केले. महाराष्ट्र शासनाकडून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात.इयत्तानिहाय पात्र व लाभार्थी संख्या, प्राप्त पुस्तके याबद्दल माहिती देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केली. शाळेतील सहशिक्षक श्री. खैरे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व पालक,व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शालेय उपक्रमाचे व नियोजनाबद्दल  सर्वांनी समाधान व्यक्त केले.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली.
  सर्वामध्ये समानतेची भावना वाढीस लागली.
  आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
  अभ्यासासाठी  प्रेरणा मिळाली.



  नवीन शिक्षकांचे स्वागत :
      
 आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मधील नवीन शैक्षणिक वर्षात शाळेत आलेल्या नवीन शिक्षकांचे स्वागत व येथून बदलीने दुसरीकडे गेलेल्या शिक्षकांचा सत्कार नियोजन करण्यात आले. सकाळी ८:३० वा. याप्रसंगी सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.  कार्यक्रमाची नियोजनाप्रमाणे सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक .......                यांनी केले. सर्व नवीन शिक्षकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच या शाळेतील पूर्वीचे सेवा केलेले शिक्षक यांचाही यथोचित सन्मान पालक आणि व्यवस्थापन समितेने केला. यावेळी ग्रामस्थ, पालक, सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गावातील सर्व पालक,सर्व सदस्य उपस्थित होते. शालेय उपक्रम आणि प्रगतीसाठी सर्वांनी साहाय्य करण्याचे ठरले
  उपक्रमाचे फायदे :-
     शाळा व समाज संपर्क वाढीस लागण्यास मदत झाली.
    आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
    नवीन उत्साहाने शालेय काम करण्यास मदत झाली.



  लोकसहभागातून वह्यांचे वाटप :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मधील नवीन शैक्षणिक वर्षात लोकसहभागातून सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. आपल्याच गावातील सरदार शेठ शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते श्री.सावकार शेठ शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व  सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले. वह्यांचे वाटप कार्यक्रमाची नियोजनाप्रमाणे सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी केले. श्री. सावकार शिंदे हे दरवर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत असतात त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. वाकचौरे सर यांनी त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सावकार शेठ शिंदे, सरपंच तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केली. शाळेतील सहशिक्षक श्री. खैरे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व पालक,व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली.
  सर्वामध्ये समानतेची भावना वाढीस लागली.
  आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
  अभ्यासासाठी  प्रेरणा मिळाली.


  विद्यार्थी दंत तपासणी  :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षात वर्गशिक्षकांनी केलेल्या सूचनेवरून शाळेत सर्व विद्यार्थी दंत तपासणी व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. यासाठी गावातील मान्यवरांच्या मदतीने मुख्याध्यापकांनी S M B T दंत महाविद्यालय संगमनेर येथील दंतरोग तज्ञांना शाळेत आमंत्रित केले. सर्व डॉक्टरांनी शाळेसाठी एक दिवस देण्याचे मान्य केले. त्यांच्या नियोजनानुसार आज  शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी व उपचार करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य,वैयक्तिक स्वच्छता,दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, माता पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व  सदस्य हेही उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी सर्व डॉक्टर टीमचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. शालेय उपक्रमाचे व नियोजनाबद्दल सर्वांनी समाधान व कौतुक व्यक्त केले.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी व स्वच्छतेविषयी माहिती मिळाली.
  दातांची काळजी कशी घ्यावी हे समजले.


मोफत गणवेश वाटप कार्यक्रम :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मधील नवीन शैक्षणिक वर्षातील पात्र लाभार्थींना गणवेश वाटप कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व  सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले. गणवेश वाटप कार्यक्रमाची नियोजनाप्रमाणे सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी केले. महाराष्ट्र शासनाकडून सर्व विद्यार्थींनी, आणि मागासवर्गीय विद्यार्थी,दारिद्रयरेषेखालील विद्यार्थी यांना मोफत गणवेश वाटप योजना असून त्याप्रमाणे  सर्व गणवेश शिवून आज वाटप करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. इयत्तानिहाय पात्र व लाभार्थी संख्या, प्राप्त रक्कम याबद्दल माहिती देण्यात आली. सर्व पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केली. शाळेतील सहशिक्षक श्री. कर्पे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व पालक,व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शालेय उपक्रमाचे व नियोजनाबद्दल  सर्वांनी समाधान व्यक्त केले.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली.
  सर्वामध्ये समानतेची भावना वाढीस लागली.
  आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.


  आपत्कालीन व्यवस्थापन  :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षात आपत्कालीन व्यवस्थापन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. शालेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांना नैसर्गिक संकटे, मानवनिर्मित संकटे याची माहिती दिली.भूकंप,वादळ,गारांचा पाऊस,विजांचा कडकडाट,आग,विद्युत उपकरणे अपघात,पूर तसेच अनेक दुर्घटना याबाबत माहिती आणि आपण घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.प्रथमोपचार पेटी व त्यातील साहित्य,आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र आणि त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.रस्त्याने डाव्या बाजूनेच चालावे, येताना-जाताना अनोळखी माणसाबरोबर जाऊ नये,आपल्या लहान भाऊ-बहिणीची काळजी घेणे,पावसाळ्यातील दिवसात योग्य काळजी घेणे,धोकादायक इमारती,झाडे,नदी, धरण या ठिकाणी एकटे जाण्याचे टाळावे.अशा सर्व बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शालेय उपक्रमाचे नियोजनानुसार सादरीकरण करण्यात आले.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना अपघातसमयी कसे वागावे याची माहिती मिळाली.
  प्रथमोचार पेटी व साहित्य याबाबत ज्ञान झाले.
  एकमेकांची काळजी घेण्याबद्दल जाणीव निर्माण झाली.



 विद्यार्थी आरोग्य तपासणी  :
         
आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षात दरवर्षीप्रमाणे  शाळेत सर्व विद्यार्थी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. यासाठी शासकीय डॉक्टरांची टीम शाळेत दाखल झाली.त्यांच्या नियोजनानुसार आज  शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्यतपासणी व उपचार करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य,वैयक्तिक स्वच्छता,दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आहार व व्यायामाचे महत्व,अन्न,पिण्याचे पाणी,नखे,कपडे,दात,केस,अंघोळ याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, माता पालक, सदस्य हेही उपस्थित होते.शाळेतील 100% विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी सर्व डॉक्टर टीमचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. शालेय उपक्रमाचे तसेच नियोजन व सहकार्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी व स्वच्छतेविषयी माहिती मिळाली.
  आरोग्य व व्यायाम याची माहिती मिळाली.

   

कार्यानुभव उपक्रम   :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षात वर्गशिक्षकांनी कार्यानुभव अंतर्गत मातीकाम, कागदकाम ,कोलाजकाम,नवनिर्मिती मार्गदर्शन व प्रात्यक्षिक वर्ग आयोजित करण्यात आले. यासाठी गावातील कारागीरांचीही मदत घेण्यात आली. आवश्यक साहित्याची पूर्वतयारी करण्यात आली. सर्व शिक्षकांनी विविध कलाकुसर व कौशल्य विकासासाठी पूरक उपक्रमांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध वस्तूंची निर्मिती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले.कागद कामातून विविध मनोरंजक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे कागद कटींग केली व सुंदर निर्मिती केली.साहित्य हाताळणी,वापर,काळजी आणि सुबक मांडणी याबाबत माहिती मिळाली. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी सर्व शिक्षक,गावातील कारागीर, व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. शालेय उपक्रमाचे योग्य  नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना विविध कलाकुसरीच्या वस्तूंची माहिती मिळाली.
  कागदी वस्तू तयार करणे, कोलाजकाम याची माहिती समजली.
  साहित्य,हाताळणी,वापर,मांडणी याबाबत कोणती काळजी घ्यावी हे समजले.
  

 चित्रकला स्पर्धा   :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षात वर्गशिक्षकांनी बालचित्रकला स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची यादी तयार केली. शाळास्तरावर सर्व विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागद व नियोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेऊन कलाकृतींचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे प्रदर्शनही इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी भरवण्यात आले. रंग कामातून विविध मनोरंजक, सुंदर  आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे चित्र काढण्याची संधी मिळाली.परीक्षण समितीने यातून प्रथम तीन क्रमांक निवडले.शाळेकडून या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. शालेय उपक्रमाचे योग्य  नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे चित्र रेखाटन,रंग भरणे याबाबत मार्गदर्शन मिळाले.
  उपजत सुप्त गुणांच्या विकासासाठी मदत झाली.
 साहित्य,हाताळणी,वापर,मांडणी याबाबत कोणती काळजी घ्यावी हे समजले.
  

 जागतिक योग दिन :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मध्ये शासकीय परिपत्रकानुसार जागतिक योगदिन २१ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना सतरंजी आणावयास सांगितले होते.सकाळी ७:३० वा. शाळेसमोर मैदानात विद्यार्थ्यांची योग्य बैठक व्यवस्था करण्यात आली. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी योगासनांची माहिती सांगितली.योगासने प्रात्यक्षिक, घ्यावयाची काळजी,महत्व,आरोग्याच्या दृष्टीकोनातून होणारे फायदे समजावून सांगितले. वर्गशिक्षकांनी प्रत्येक आसन प्रात्यक्षिक करून दाखवले. मैदानात काही शिक्षक विद्यार्थ्यांना आसन स्थितीबाबत माहिती देत होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यासाठी मदत करत होते. योग प्रार्थना, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार,मुक्त हालचाली यासारखे विविध उपक्रम घेण्यात आले. हालचालींतील कृतीतील क्रम व समन्वय,संतुलन याबाबत दक्षता घेतली. शाळास्तरावर सर्व विद्यार्थ्यांनी योगदिन उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला व योगासने,सूर्यनमस्कार कृतींचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी सुंदर आसन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून योगदिन कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना आरोग्य, आहार, व्यायामप्रकार याबाबत मार्गदर्शन मिळाले.
  मानसिक, शारीरिक सुदृढता विकासासाठी मदत झाली.


 रक्षाबंधन दिन :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मध्ये  आज रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. सकाळी ९:३० वा. शाळेसमोर मैदानात विद्यार्थ्यांची योग्य बैठक व्यवस्था करण्यात आली. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी रक्षाबंधन सणाची माहिती सांगितली. राखी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.  विद्यार्थ्यांनी आपापल्या कलाकुसरीने सुंदर राख्या तयार केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन  उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी मुलींना भेटवस्तू व खाऊ देऊन स्वागत केले. भावा बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा हा सण आनंदाने साजरा करण्यात आला.सर्वांनी या सुंदर उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून रक्षाबंधन कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम,जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली. 
  संस्कार व संस्कृती संवर्धनासाठी उपक्रमाची मदत झाली.
  राखी तयार करणे या उपक्रमातील कृतीशील सहभागामुळे कलाकौशल्य विकसित झाले.
  

 तिळगुळ घ्या..गोड गोड बोला.. :

आज दिनांक -  १६ / १  / २०१९      वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
      शैक्षणिक वर्ष सन २०१८-१९ मध्ये  आज मकरसंक्रांतीचा सण :  दि. १६/०१/२०१९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. सकाळी १०:३० वा. शाळेसमोर मैदानात विद्यार्थ्यांची योग्य बैठक व्यवस्था करण्यात आली. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी मकरसंक्रांत सणाची माहिती सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी या  उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन उत्साहाने सहभाग घेतला. नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण आनंदाने साजरा करण्यात आला.सर्वांनीच या सुंदर उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम,जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली. 
   संस्कार व संस्कृती संवर्धनासाठी उपक्रमाची मदत झाली.
   तिळाचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे समजले.

  

 फटाके मुक्त दिवाळी सण संकल्प :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र संपत असताना दिवाळी सणाची चाहूल लागते. सुट्टीतील हा दिव्यांचा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो.दिवाळीतील विविध प्रकारचे फटाके व त्यामुळे ध्वनिप्रदूषण,वायू प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल त्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी दिवाळीतील विविध सणांची माहिती व महत्व सांगितले. यावेळी मुलींसाठी सुंदर रांगोळी काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपापल्या कलाकुसरीने सुंदर रांगोळी काढून सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी या सणाला कोणत्याही प्रकारचे फटाके वाजवणार नाही असा संकल्प केला.प्रेम,आनंद,उत्साह,मांगल्य आणि पावित्र्य प्रतिक असणारा दिवाळी सण आनंदाने साजरा करण्याचा सर्वांनी निश्चय केला.. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम,आणि संवर्धनासाठी दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली. 
  संस्कार व संस्कृती संवर्धनासाठी उपक्रमाची मदत झाली.
  रांगोळी :उपक्रमातील कृतीशील सहभागामुळे कलाकौशल्य विकसित झाले.
  ध्वनी प्रदूषण, वायू प्रदुषण आणि आरोग्यावर होणारे परिणामांची जाणीव.
  

 मिशन गोवर व रुबेला लसीकरण :

आज दिनांक -  २८ /११/ २०१८     वार –
     सन २०१८-१९ मध्ये  आज मिशन गोवर व रुबेला लसीकरण मोहिमे अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्याना लसीकरण करण्यात आले. सन २०२० पर्यंत भारतातून गोवर रुबेलाच समूळ उच्चाटन करण्याच ध्येय शासनाने निश्चित केलेले आहे. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना हि लस दिली जाते. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.लाळगे यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात झाली. त्यांनी या लसीविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. हा उपक्रम चांगला असून ही लस अतिशय सुरक्षित आहे.या मोहिमेत सर्व मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. शाळेतील १०० % विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सेविका, आशा सेविका, सरपंच उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सर्वांनी या सुंदर उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी लसीकरणासाठी व मुलांच्या मनोरंजनासाठी उत्तम नियोजन करून मिशन गोवर व रुबेला लसीकरण कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व स्वच्छता याविषयी माहिती मिळाली.
    रोगप्रतिबंधक उपचार याविषयी ज्ञान मिळण्यास मदत झाली.
  

 आज माझा वाढदिवस ...   :

आज दिनांक -    /   /       वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
      शैक्षणिक वर्ष सन २०१८-१९ मध्ये   आज माझा वाढदिवस या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल त्याचा परिपाठात वाढदिवस साजरा केला जातो. सर्व विद्यार्थी त्याचे वाढदिवसाचे गीत गाऊन तसेच गुलाबपुष्प देऊन शुभचिंतन करतात. व्हरांड्यात असणाऱ्या फलकावर त्याचे नाव लिहून शुभेच्छा दिल्या जातात. पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतात. सकाळी १०:३० वा. शाळेसमोर मैदानात परिपाठ संपल्यानंतर छोटासा कार्यक्रम व त्याचे सर्व संयोजन,सूत्रसंचालन विद्यार्थी गट करत असतो. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक या विद्यार्थ्याला शुभेच्छा देतात. खाऊ, शाळेसाठी गोष्टीचे पुस्तक भेट म्हणून दिले जाते. सर्व विद्यार्थी आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम,जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली. 
   संस्कार व मूल्य संवर्धनासाठी उपक्रमाची मदत झाली.
    आपापसांत सहकार्य,खिलाडूवृत्ती,स्नेह वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

  


 वाढदिवस शिक्षकांचा ...   :

आज दिनांक -    /   /       वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
      शैक्षणिक वर्ष सन २०१८-१९ मध्ये   आज माझा वाढदिवस या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षकांचा  वाढदिवस विद्यार्थी साजरा करतात. सर्व विद्यार्थी वाढदिवसाचे गीत गाऊन तसेच गुलाबपुष्प देऊन शुभचिंतन करतात, शुभेच्छा दिल्या जातात. सकाळी १०:३० वा. शाळेसमोर मैदानात परिपाठ संपल्यानंतर छोटासा कार्यक्रम व त्याचे सर्व संयोजन,सूत्रसंचालन विद्यार्थी गट करत असतो. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक  शुभेच्छा देतात. विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन,, शाळेसाठी गोष्टीचे पुस्तक भेट म्हणून दिले जातात. सर्व विद्यार्थी आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांबद्दल प्रेम,जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली. 
   संस्कार व मूल्य संवर्धनासाठी उपक्रमाची मदत झाली.
   आपापसांत सहकार्य,खिलाडूवृत्ती,स्नेह वृद्धिंगत होण्यास मदत झाली.


  

 जो दिनांक.. तो पाढा  ...   :

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
      शैक्षणिक वर्ष सन २०१८-१९ मध्ये प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर योग्य गतीने व सहज व्हावे यासाठी आणि गणिती क्रिया झटपट करता याव्यात, पाठांतर आनंददायी व्हावे यासाठी  “जो दिनांक ..तो पाढा..” या उपक्रमाची अंमलबजावनी करण्याचे ठरले. उपक्रमाचे स्वरूप, माहिती परिपाठात विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या उपक्रमांतर्गत तारखेनुसार पाढा परिपाठात म्हणणे व दिवसभरात तो पाढा गटागटात  पाठांतर करायचा. आजचा पाढा दर्शनी फलकावर लिहून मधल्या सुट्टीत मुले पाढा पाठांतर करत असतांना दिसू लागली. पाढे पाठांतर करण्याची आवड निर्माण करता आली. दर शनिवारी कोणाचे पाढे जास्त पाठांतर आहेत त्या विद्यार्थ्यांचे कौतुक परिपाठात केले. हळूहळू पाढे पाठांतर करण्याची जणू स्पर्धाच लागली असे वातावरण निर्माण झाले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक या विद्यार्थ्याला शुभेच्छा देतात. सर्व विद्यार्थी आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात.
  उपक्रमाचे फायदे :-
    विद्यार्थ्यांमध्ये पाढे पाठांतराची आवड निर्माण झाली. 
    गणिती क्रिया झटपट करण्यासाठी या उपक्रमाची मदत झाली.
     हसत खेळत उपक्रमातून गणिताची आवड निर्माण झाली.




 ग्राम स्वच्छता अभियान  : ( एक दिवस गावासाठी )
आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मध्ये  आज ग्राम स्वच्छता मोहिमे अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेतला. आपले गाव स्वच्छ व सुंदर असावे यासाठी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी गावातून विविध घोषणा देत प्रभातफेरी काढली. गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. केर-कचरा गोळा करून त्याचे ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यात आला. स्वच्छतेचे संदेश असणारे फलक, स्वच्छता गीत, यामुळे गावातील लोकांचे उदबोधन होण्यास मदत झाली. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आरोग्य,वैयक्तिक स्वच्छता,पाण्याचा वापर, कचरा व्यवस्थापन,सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,याबाबत माहिती सांगितली. या प्रसंगी आरोग्य सेविका, आशा सेविका, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सर्वांनी या सुंदर उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व स्वच्छता याविषयी माहिती मिळाली.
    आपले गाव सुंदर गाव ही संकल्पना रुजवण्यात मदत झाली.




 पालक मेळावा  :
आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मध्ये  आज पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व पालकांना निमंत्रण पत्रिका देण्यात आलेल्या होत्या.. सकाळी ९:३० वा. शाळेसमोर व्हरांड्यात योग्य बैठक व्यवस्था करण्यात आली. मुख्याध्यापक श्री वाकचौरे सरांनी पालक मेळाव्याचा उद्देश,फायदे सांगितले. या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सर्व सदस्य,पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विषय सूचीनुसार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या मेळाव्यात आदिवासी सुवर्ण महो.शिष्यवृत्ती,सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, गणवेश लाभार्थी,उपस्थिती भत्ता,शाळा डिजिटल करणे तसेच विद्यार्थी गुणवत्ता, अप्रगत विद्यार्थी सुधारण्यासाठी विविध उपक्रम,शाळेच्या गरजा यासारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून पालक मेळावा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. शालेय उपक्रम, योग्य नियोजन व तयारी याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले.
  उपक्रमाचे फायदे :-
    पालक व शिक्षक संबंध दृढ होण्यास मदत झाली. 
    शाळेच्या गरजा निश्चित करून पूर्ततेसाठी नियोजन करता आले.




 विद्यार्थी वजन व उंची  :

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मध्ये   विद्यार्थी वजन व उंची या मोहिमे अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्याचे दर तिमाही वजन करणे व उंची मोजून BMI निश्चित करणे. आरोग्या संबंधी माहिती मिळवून पुढील उपाययोजना करणे.अभ्यास,गुणवत्ता याबरोबरच उत्तम आरोग्य याबाबत काळजी घेणे.यासाठी उपक्रमाची अंमल बजावणी करण्याचे ठरले. सुदृढ विद्यार्थी, तसेच इतर कमी वजन गटातील विद्यार्थ्यांना आहार,व्यायाम,याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत सर्व मुलांनी सहभाग घेतला. शाळेतील १०० % विद्यार्थ्यांचा BMI दर तिमाही काढून त्यावर चर्चा,उपाययोजना करण्यात येते. पालकांना याबाबत माहिती देऊन मुलांच्या आरोग्य व आहार याचे मार्गदर्शन केले जाते.सर्वांनी या सुंदर उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजन व तयारीमुळे
  उपक्रमाचे फायदे :-
   विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छता याविषयी माहिती मिळाली.
    रोगप्रतिबंधक उपचार याविषयी ज्ञान मिळण्यास मदत झाली.
    आहार व व्यायामाचे महत्व समजले.
    वजन व उंची प्रमाण माहित झाल्यामुळे आरोग्याविषयी सजगता निर्माण झाली.



               प्रश्नमंजुषा स्पर्धा   :

आज दिनांक -     /   / २०१८     वार –
     सन २०१८-१९ मध्ये दररोज परिपाठात नियोजनाप्रमाणे प्रश्नमंजुषा घेतली जाते.विविध प्रश्नांचा सराव झाल्यामुळे आज स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची यादी करून विद्यार्थ्यांचे चार गट करून त्या गटांना नाव देण्यात आली.सामान्यज्ञान,गणित,बुद्धिमत्ता,भूगोल,इतिहास,चालू घडामोडी यावर आधारित प्रश्नाच्या चिठ्या तयार करण्यात आल्या. शाळेसमोर मैदानात योग्य बैठक व्यवस्था करण्यात आली.प्रत्येक गटात चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.प्रश्नमंजुषेचे नियम समजावून सांगण्यात आले. प्रश्नफेरी व प्रत्येक प्रश्नास गुण,बोनस गुण,याबाबत माहिती दिली.प्रत्यक्ष प्रश्न मंजुषा कार्यक्रमास सुरुवात झाली.फेरीनिहाय गुण जाहीर करण्यात येत होते. सर्व फेरी अंती सर्वांत जास्त गुण प्राप्त गटास विजयी घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हसत खेळत या उपक्रमात भाग घेतला आणि अगदी सहजच विद्यार्थ्याचा सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी अवांतर वाचनाकडे कल वाढला. शाळेकडून या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. शालेय उपक्रमाचे योग्य नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्याची आवड निर्माण झाली.




  शालेय मंत्रिमंडळ निवडणूक    :

       आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मध्ये शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवड करण्याबद्दल चर्चा झाली. विद्यार्थ्यांमधील उपजत नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी तसेच त्यांना विविध कामांचा अनुभव, लोकशाही निवडणूक पद्धतीबद्दल माहिती व्हावी यासाठी शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे ठरले. इच्छुक विद्यार्थी यादी तयार करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना निवड पद्धती बद्दल माहिती देण्यात आली.निवडणूक तारीख व इच्छुक उमेदवार नावे जाहीर करण्यात आली. गुप्त मतदानाने सर्वाधिक मत मिळवलेला उमेदवार विजयी होणार यामुळे विद्यार्थी प्रचार करत होते. गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले.आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावापुढे शिक्का मारून मुले मतदान करत होती. दुपारी मत मोजणी करून विजयी उमेदवार जाहीर करण्यात आले. सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. मुलांना या सर्व पद्धतीचा अवर्णनीय आनंद झाल्याचे दिसत होते. सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी योग्य नियोजन व नियंत्रण ठेऊन एकत्रितपणे हा उपक्रम यशस्वी पार पाडला.
उपक्रमाचे फायदे :-
लोकशाही निवडणूक : गुप्त मतदान पद्धतीची माहिती प्रत्यक्ष मिळाली.
जबाबदारी व कर्तव्य याची जाणीव झाली.


  

 मनोरंजक खेळ ....    :

       आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मध्ये दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत विविध ज्ञानवर्धक,मनोरंजक,आनंददायी उपक्रमांचे नियोजनाप्रमाणे आयोजन केले जाते.विविध विविध मनोरंजक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या. इच्छुक सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. क्रीडा प्रकारानुसार  स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय यादी करून विद्यार्थ्यांचे गट करून त्या स्पर्धा घेण्यात आल्या. पोते उडी, तीन पायांची शर्यत, चमचा लिंबू, नागमोडी धावणे, संगीत खुर्ची, बेडूक उड्या, गाढवाला शेपूट लावणे,   यासारख्या विविध स्पर्धा घेतल्या.. शाळेसमोर मैदानात योग्य बैठक, मैदान आखणी करून व्यवस्था करण्यात आली. खेळाचे नियम समजावून सांगितले.प्रत्येक क्रीडा प्रकारानुसार यादीप्रमाणे खेळ घेण्यात आले. शेवटी विजयी विद्यार्थ्यांचे सर्वच विद्यार्थी टाळ्या वाजवून अभिनंदन करत होते. विद्यार्थ्यांनी हसत खेळत या उपक्रमातील सर्वच क्रीडा प्रकारात भाग घेतला शाळेकडून या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षक यांनी उपक्रमाचे योग्य नियोजनामुळे सर्व स्पर्धा यशस्वी झाल्या.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुदृढता निर्माण होण्यास मदत झाली.
  आरोग्य व व्यायाम याचे महत्व समजले.



विविध स्पर्धा  ....    :
        
आज दिनांक -     /   / २०१८     वार –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी दुमाला ता. संगमनेर
     सन २०१८-१९ मध्ये  दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत विविध ज्ञानवर्धक,मनोरंजक,आनंददायी उपक्रमांचे नियोजनाप्रमाणे आयोजन केले जाते.विविध विविध मनोरंजक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या. इच्छुक सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. क्रीडा प्रकारानुसार  स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय यादी करून विद्यार्थ्यांचे गट करून त्या स्पर्धा घेण्यात आल्या. पोते उडी, तीन पायांची शर्यत, चमचा लिंबू, नागमोडी धावणे, संगीत खुर्ची, बेडूक उड्या, गाढवाला शेपूट लावणे,   यासारख्या विविध स्पर्धा घेतल्या.. शाळेसमोर मैदानात योग्य बैठक, मैदान आखणी करून व्यवस्था करण्यात आली. खेळाचे नियम समजावून सांगितले.प्रत्येक क्रीडा प्रकारानुसार यादीप्रमाणे खेळ घेण्यात आले. शेवटी विजयी विद्यार्थ्यांचे सर्वच विद्यार्थी टाळ्या वाजवून अभिनंदन करत होते. विद्यार्थ्यांनी हसत खेळत या उपक्रमातील सर्वच क्रीडा प्रकारात भाग घेतला शाळेकडून या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षक यांनी उपक्रमाचे योग्य नियोजनामुळे सर्व स्पर्धा यशस्वी झाल्या.
  उपक्रमाचे फायदे :-
  विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुदृढता निर्माण होण्यास मदत झाली.
  आरोग्य व व्यायाम याचे महत्व समजले.


No comments:

Post a Comment

    ◉✿ [ लोकसहभागातून होत आहे कायापालट ]✿◉  *🏆माझे गाव..      *माझी शाळा..*     *माझा अभिमान..*                  *★आपली शाळा....*        ...